पाकिस्तानातील छळाचे ३ महिने २१ दिवस

पाकिस्तानातल्या कोठड्यांमध्ये 29 सप्टेंबर 2016 पासून तब्बल 3 महिने 21 दिवस अनन्वित यातना सोसणाऱ्या चंदू चव्हाण, यांची अखेर 21जानेवारी 2017 रोजी नरकयातनांमधून सुटका झाली.

मी, जवान चंदू चव्हाण. तुमच्याशी खूप काही बोलायचंय... किती तरी गोष्टी सांगायच्या आहेत.

निधड्या छातीनं पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला..! हातात एके-47, गळ्यात शिवाजी महाराज अन्‌ पाठीवर सॅक.

पुढे वाचा ...

हिंदी आवृत्ती के लिए यहाँ क्लिक करें

मराठी आवृत्ती

img

वयाची बाविशी, म्हणजे खरंतर सरत चाललेलं कॉलेजपण अन्‌ मनात फेर धरणारं वय. या वयात अनुभव असावेत ते उमलू पाहणारं आयुष्य समृद्ध करणारं. स्वप्नं असावीत ती टोलेजंग भविष्याबद्दलची. अशा वयात जीवन-मरणाची लढाई क्षणोक्षणी करावी लागली तर..? एखाद-दुसरा दिवस नव्हे, तब्बल 3 महिने 21 दिवस. प्रत्येक सेकंदा-सेकंदाला मृत्यूचं भय अवतीभवती असलं तर...? अंधारात सरपटत, भिंतींशी बोलत दिवस काढावे लागले तर...? कोण भोगेल हा छळ...? उत्तर आहे, भारतीय जवान चंदू चव्हाण. पाकिस्तानातल्या कोठड्यांमध्ये 29 सप्टेंबर 2016 पासून तब्बल 3 महिने 21 दिवस अनन्वित यातना सोसणाऱ्या चंदू चव्हाण, यांची अखेर 21जानेवारी 2017 रोजी नरकयातनांमधून सुटका झाली. पाकिस्तानातील यशस्वी सर्जिकल स्ट्राईकचा देशभर जल्लोष चालू असतानाच, चंदू चव्हाण पाकिस्तानच्या ताब्यात सापडले. त्यांच्या सुटकेसाठी भारत-पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फैरी झडल्या...देशवासीयांनी त्यांच्या सुटकेसाठी प्रार्थना केल्या. भारत सरकार, देशातले असंख्य नागरिक, प्रसारमाध्यमं, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व बंधू भूषण चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आलं अन्‌ 3 महिने 21 दिवसांच्या अनंत जीवघेण्या यातना सहन केल्यानंतर, जवान चंदू चव्हाण धुळे जिल्ह्यातल्या इवल्याश्‍या बोरविहीर या त्यांच्या गावात परतले... त्यांच्या आगमनानंतर गावासह संपूर्ण देशानंच जल्लोष केला...!

मी, जवान चंदू चव्हाण. तुमच्याशी खूप काही बोलायचंय... किती तरी गोष्टी सांगायच्या आहेत. किती-किती गोष्टी मनात आहेत म्हणून सांगू. त्या सर्व तुमच्यासमोर मोकळ्या करायलाच हव्यात. खरंच, पुर्नजन्म काय असतो, हे मी प्रत्यक्ष अनुभवलंय. मला दुसरा जन्म मिळालाय... होय दुसरा! आणि तोदेखिल देशवासीयांनी केलेल्या प्रार्थनांमुळं. भारत सरकारनं केलेल्या अथक प्रयत्नांमुळं. संरक्षणमंत्री डॉ. सुभाष भामरे (बाबा) अन्‌ माझा पाठीराखा भाऊ भूषण यांच्या जिद्दीमुळं. लहानपणापासून किती अन्‌ काय-काय सहन करत आलोय म्हणून सांगू. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार असतात हे ऐकलेलं, वाचलेलं. पण, माझ्या आयुष्यात फक्त दुःख आणि दुःखच भरलंय की काय? कधी-कधी असंच वाटण्याजोगीच परिस्थिती आहे. आता मात्र दुःखाचा डोंगर पार केलाय, तो कायमचा. पाकिस्तानी कारागृहात असताना सर्व काही अनुभवलंय. सहन केलंय. खूप काही सहन केल्यानंतर दुःख या शब्दाबद्दल काही वाटेनासंच झालंय. या जन्मातला प्रत्येक क्षण मातृभूमीच्या सेवेसाठी घालवायचाय. माझे आई-वडील तर लहानपणीच सोडून गेले आहेत. त्यांचे चेहरे पुसटसेही आठवत नाहीत. मातृभूमीलाच माता-पिता समजून, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची सेवा करणार आहे. पाकिस्तानातील अनुभव पुस्तकातून तुमच्यासमोर कथन करणार आहे. तिथं किती अन्याय, किती जुलूम सहन केलाय, हे तुमच्यापुढं मांडणार आहे...

चंदू बाळा येना रे जवळ... इकडे ये ना चंदू... आईची तळमळ होत होती. पण... मला काही कळत नव्हतं. अगदी लहान होतो. आईकडे जायला मी तयार नव्हतो. दिवसेंदिवस प्रकृती आणखीनच खालावत चालली होती. शरीरात त्राणही उरला नव्हता. डॉक्‍टरांनी ही अगदी शेवटची अवस्था असल्याचं जाहीर केलं. अखेर जे घडायचं ते घडलंच. वडील गेल्यानंतर दोन वर्षांनी आईसुद्धा आम्हा तिघा भावंडांना सोडून गेली. खऱ्या अर्थानं आई-वडिलांविना आम्ही पोरके झालो. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी... आईला देवानं आमच्यापासून दूर केलं.... आई देवा घरी गेली ती कायमचीच. परत न येण्यासाठी....

भरतीच्या ठिकाणी खासगी वाहनानं जाण्याइतपत खिशात पैसेही नव्हते. वेळ तर खूपच कमी होता. रडू कोसळत होते. पण, वेळ दवडून उपयोग नव्हता. काही झाले तरी भरतीच्या ठिकाणी पोचायचंच असा निर्धार केला... मोठा श्‍वास घेतला अन्‌ पळत सुटलो. सेंकदा-सेकंदाला पळण्याचा वेग वाढत होता. एक किलोमीटर... दोन... तीन, चार, पाच, असं दहा किलोमीटरचं अंतर मोठ्या वेगात पार केलं. घामाघूम झालो होतो... दम लागला होता. पण, मनात जिद्द होती...

निधड्या छातीनं पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला..! हातात एके-47, गळ्यात शिवाजी महाराज अन्‌ पाठीवर सॅक... पाकिस्तानची हद्द... जंगलातून 3 ते 4 किलोमीटर अंतर पुढे चालत गेलो... ठिकठिकाणी कबरी दिसत होत्या. मनात भीती अशी उरलीच नव्हती... अमावस्येमुळं अंधारून आलं होतं...

पाकिस्तानी सैनिक बेदम मारहाण करत होते. एक क्षणही थांबत नव्हते. मारहाण करत असतानाच चौकशीही चालू होती. डोक्‍यावर काळा बुरखा चढवला गेल्यामुळं कोण कुठून मारतंय ते काही समजतही नव्हतं. लाथा-बुक्‍क्‍या, रायफलचा दणका सर्वकाही सहन करत होतो. "भारत माता की जय...' अशी घोषणा दिल्यानंतर ते अधिकच चवताळायचे आणि नव्या जोमानं मारायचे. पाकिस्तानी सैनिकांच्या तावडीतून आता आपली कधीही सुटका होणार नाही, हे पूर्णपणे माहित होतं. लष्करी नियमानुसार त्यांना खरी माहिती द्यायची नाही, अशी शिकवण होती. त्यांच्या एकाही प्रश्‍नाचं उत्तर मी दिलं नाही. मी काहीच सांगत नसल्यानं चिडून ते आणखी जोरानं मारत होते. मोबाईलमध्ये शूटिंग करत होते... मार सहन करण्याशिवाय हातात काही उरलंच नव्हतं....

कोठडीत टाकल्यापासून रात्र आहे की दिवस, हे काहीच समजत नव्हतं. कडाक्‍याची थंडी पडली होती. मला पांघरूणही दिलं नव्हतं. उघड्यावर टाकलं होतं. डास, किडे कडाडून चावत. पोटात आग पडली होती. तोंड कोरडं पडलं होतं. अंगठ्यातील रक्त गोठलं होतं. वरकडी म्हणून मारहाण. साध्या पाण्यालाही मी महाग झालो होतो. पाणी मागितलं, की बेदम मारहाण व्हायची....

माझ्या शेजारच्या कोठडीत मारहाण सुरू झाली, की पुढचा नंबर आपला, हे निश्‍चित समजावं. हातानं शरीराला स्पर्श केल्यानंतर ते सुजलेलं जाणवत असे. शरीरभर टोचून-टोचून जखमा झालेल्या. कुठंही हात लावला तरी टोचलेल्या ठिकाणच्या जखमा जाणवायच्या. अत्याचार आणि अपुरं व निकृष्ट खाणं, यामुळं अशक्तपणा आला होता....

माझ्या गीतामधून मी भारतमातेचा जयजयकार करतोय, हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर पुन्हा मारहाण सुरू व्हायची. मारहाण करायला सतत वेगवेगळे लोक येत. त्यांचा दम जिरेपर्यंत नुसतं मारत बसत....

29 सप्टेंबर 2016 च्या काळरात्रीनंतर लख्ख सूर्यप्रकाशात आलो, तो दिवस होता 21 जानेवारी 2017. हा दिवस अनुभवला तो ही माझ्या मातृभुमीमध्ये !...

"पाकिस्तानच्या नरकयातनामधून माझी सुटका व्हावी यासाठी कोट्यवधी देशवासीयांनी प्रार्थना केली होती. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे सतत पाठपुरावा करत होते. माझ्या कुटुंबीयांना दिलेला शब्द त्यांनी खरा करून दाखवला. भाऊ भूषण चव्हाण व अनेकांचे आशीर्वाद कामी आले. प्रसारमाध्यमांनीही शेवटपर्यंत विषय लावून धरला होता. भारतात आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाकडून सातत्यानं प्रयत्न केले जात होते. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही मला मायदेशी आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात होते. मला ही माहिती माझ्या सुटकेनंतर समजली. माझ्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाचे मी मनःपूर्वक आभार मानतो. मी शेवटच्या क्षणापर्यंत मातृभूमीची सेवा करत राहीन, असं अभिवचन देतो. "जय हिंद' ।

पाकिस्तानमधून सुटून आल्यानंतर काही दिवसांतच मी लष्करी सेवेत पुन्हा रूजू झालो. प्रत्येक सहकारी आणि अधिकारी प्रेमानं, आपुलकीनं माझी किती काळजी घेतात, हे जाणवतं. ते दिवस विस्मृतीच्या खोल कप्प्यात गाडून टाकायचे आहेत. आता केवळ मातृभूमीची सेवा करायची आहे. अखेरच्या क्षणापर्यंत माझं तेच ध्येय असणार आहे..! "भारत माता की जय..!' "शिवाजी महाराज की जय..!' "जय हिंद..!'

लेखकाचा परिचय

img

श्री. संतोष प्रभू धायबर गेली २१ वर्षे पत्रकारितेत आहेत. ते सध्या दैनिक ‘सकाळ’मध्ये वरीष्ठ उपसंपादक आहेत. त्यांनी समकालिन सामाजिक विषयांवर सातत्याने लेखन केले आहे. सोशल नेटवर्किंग माध्यमे, त्यांचा प्रसार, त्यांचा समाजावर झालेला परिणाम हे त्यांचे अभ्यासाचे विषय. सामाजिक विषयावरील त्यांचे अनेक लेख, ब्लॉग प्रसिद्ध झाले आहेत. भारतीय लष्कर व जवान हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय.

पाकिस्तानच्या ताब्यात अडकलेले जवान चंदू चव्हाण यांच्या नावाची चर्चा २०१६ च्या अखेरीस सर्वाधिक झाली. चव्हाण यांनी पाकिस्तानच्या अंधारकोठडीत असह्य वेदना भोगल्या. चव्हाण भारतात परतल्यानंतर सर्वप्रथम श्री. धायबर यांनी त्यांची भेट घेऊन मुलाखत मिळविली. ती मुलाखत ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली आणि देशभर गाजली.

श्री. धायबर यांचे हे दुसरे पुस्तक. यापूर्वी कर्मयोगी कुंडलिकराव थोरात यांच्या आत्मचरित्राचे त्यांनी लेखन केले आहे. श्री. धायबर यांची नवी कादंबरी प्रकाशनाच्या मार्गावर आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्‍याचे www.shirurtaluka.com हे संकेतस्थळ त्यांनी नऊ वर्षांपूर्वी सुरू केले. अशा प्रकारचे प्रयोग तेव्हा अत्यंत मर्यादित होते.

हिंदी आवृत्ती

img

उम्र केवल बाईस साल, वास्तव में महाविद्‌यालयीन शिक्षा समापन की ओर और मन में मस्त जिंदगी जिने की उम्र ! इस उम्र में बहार की ओर दौडनेवाली जिंदगी समृद्‌ध करनेवाले अनुभव । बेहतरीन जिंदकी के भविष्य के सपने और इस उम्र में जीवन मृत्यु की लडाई कदम कदम पर करनी पडी तो ? एक दो दिन नहीं तो पुरे तीन महिने और इक्कीस दिन. हर पर मृत्यु का डर आसपास हो तो ? रात में रेंगकर, दीवारों से बातें करके दिन बिताने पडे तो ? कौन सह लेगा यह छल ? जवाब है- भारतीय जवान चंदू चव्हाण. पाकिस्तान की अन्यान्य कालकोठरी में 29 सितंबर 2016 से करीबन 3 महिने और इक्कीस दिनों तक अनन्वित यातना बर्दाश्‍त करनेवाले चंदू चव्हाण की आखिर 21 जनवरी 2017 को नरकयातना ओं से रिहाई हुई ।

पाकिस्तान में सफलता से पूरा किया हुआ सर्जिकल स्ट्राईक का जलसा पूरे देश में जब शुरू था तब चंदू चव्हाण पाकिस्तान के हाथ लग गए । उनकी रिहाई के लिए भारत- पाकिस्तान के अधिकारियों में बहुत वाद-विवाद हुए । देशवासियों ने उनकी रिहाई के लिए प्रार्थना की । भारत सरकार, देश के असंख्य नागरिक, प्रसार माध्यम, केंद्रीय सुरक्षा राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे तथा बंधू भूषण चव्हाण के प्रयास सफल रहे और 3 महिने और 21 दिनोंतक नरकयातना बर्दाश्‍त करने के बाद, जवान चंदू चव्हाण धुले जिले का छोटा गॉंव बोरविहिर में लौट आएँ.... उनके आगमन के पश्‍चात न केवल गॉंव बल्कि पूरे देश में जलसा हुआ। मैं जवान चंदू चव्हाण। आपसे बहुत सारी बातें करनी हैं -- बहुत कुछ कहना है। आपसे कैसे कहूँ ? बहुत सारी बातें मन में हैं। उन सभी को आपके सम्मुख खुलकर बताना चाहता हूँ। सच, पुनर्जन्म कैसा होता है इसे मैंने अनुभवित किया है। मुझे दूसरी जिंदगी मिली है - सच दुसरी ! देशवासियों द्‌वारा की गई प्रार्थनाओं से। भारत सरकार द्‌वारा किए गए अथक प्रयासों से। केंद्रीय सुरक्षा मंत्री डॉ. सुभाष भामरे जी (बाबा) तथा मेरी मदद करनेवाला मेरा भाई भूषण की जिद की वजह से। कैसे कहूँ - बचपन से कितनी मुसीबतों का सामना मैंने किया है। हर व्यक्ति की जिंदगी में चढाव उतार होते हैं ऐसा सुना है, पढा है लेकिन क्‍या मेरी जिंदगी में केवल दुःख ही दुःख है ? कभी कभी ऐसी ही स्थिति होती है। अब मैं हमेशा के लिए दुःख के पर्बत के उस पार पहुँच चुका हूँ । पाकिस्तान के कैदखाने में रहते हुए सबकुछ अनुभवित किया है, बर्दाश्‍त किया है। बहुत कुछ बर्दाश्‍त करने पर दुःख के बारे में मुझे कुछ विशेष नहीं लगता। इस जन्म का हर पल मातृभूमि की सेवा करने हेतु बिताना है। माता-पिता तो बचपन में ही ईश्‍वर को प्यारे हो गए । उनके चेहरे जरा भी याद नहीं। मातृभूमि को ही माता-पिता मानकर अंतिम सास तक सेवा करूँगा । पाकिस्तान के अनुभव पुस्तक के माध्यम से आपके सम्मुख कथन करूँगा । वहॉं बर्दाश्‍त किया हुए अन्याय तथा जुल्म से आपको अवगत करा दूँगा।

माता- पिता के मृत्यु के पश्‍चात पूरा घर ध्वस्त हुआ था। सबकुछ खत्म हुआ था। भूषण और रूपाली को लेकर नाना- नानी ननिहाल पहुँचे । बुआ ने मुझे अपने पास ही रख लिया, मॉं को दिया हुआ वचन पूरा करने हेतु। माता- पिता के पश्‍चात हम तीनों भाई बहन जुदा हो गए।

पाकिस्तान के खिलाफ भडक उठा था। अपनी ओर से पाकिस्तान की ओर तेजी से गोलीबारी जारी थी। कुछ भी हो लेकिन पाकिस्तान के सैनिकों का खातमा करना ही है। ठंड के दिन थे। पटाकों के बजाए गोलियों की आवाज हो रही थी। शाम हो रही थी। अमावस की रात थी। मेरे पीठ पर सैक थी। उसमें चक्कू, बैटरी, आधारकार्ड, बटवे में कुछ पैसे और खाने के लिए काजू, बादाम थे। धडाड्‌ धाड ऐसी आवाजों से पूरा इलाका कंपित हो रहा था।

मैंने भारत-पाकिस्तान की सीमा में ंप्रवेश किया। मातृभूमी छोडकर दुश्‍मन की सीमा में दाखिल हुआ। हॉं, सीना तानकर बडी निडरता से पाकिस्तान में प्रवेश किया। हाथ में एके-47, गले में शिवाजी महाराज और पीठ पर सैक... पाकिस्तान की सीमा से अंदर जंगल में 3-4 कि.मी. तक अंदर चला गया।

जब होश आया तब मेरी आँखों पर बुरखा था। प्यास लगने से जीव व्याकुल हुआ था। गला सूख गया था। दीर्घ काल से पानी की एक बूँद भी पेट में नहीं गई थी। विव्हलते हुए मैंने पानी की मॉंग की। इससे भी वे गुस्सा हो गए और मुझे बेहद पीटा।

कोठरी में हरपल मृत्यू नजर आ रहा था। मारपीट होने पर बी सीना तानकर उनके सम्मुख जाता था। इससे वे बहुत गुस्सा हो रहे थे। पाकिस्तान के सैनिक मारपीट करने पर थक जाते थे और बाद में बाहर जाते थे।

मेरे गीत से मैं भारत माता की जयजयकार कर रहा हूँ यह बात उनके ध्यान में आ गई। उन्होंने मुझे पीटना शुरू किया। अलग अलग लोग आते थे। जब तक उन्हें थकान महसूस नहीं होती थी तब तक पीटते थे। पीटने के बाद नमाज पढने के लिए मजबूर करते थे।

पाकिस्तानी सैनिक इतनी प्यार से क्‍यों बातेंकर रहे हैं ? अब मारपीट भी कम मात्रा में हो रही है। शायद फॉंसी पर लटकाने की तैयारी करते होंगे। क्रांतिकारी देश के लिए फॉंसी पर चढे थे अब मैं भी उसी राह पर चल रहा हूँ। हमेशा की तरह उनके सैनिक कोठरी में आ गए और पूछताछ करने लगे। फिर यथेच्छ मरापीट और बाद में इंज्क्‍शन दिया। मैं बेहोश हुआ।

जब मुझे होश आया तब मैं अस्पताल में एक कटिए पर था। लंबे समय के बाद मुझे रोशनी दिखाई दी। आँखें धुँधला होने के कारण रोशनी देखने की अतीव होते हुए बी ज्यादा देर तर अपनी आँखें खुली नहीं रख सकता था। कुछ समय तक वैसा ही लेटा रहा। परिवर्तन जरूर हुआ था। लेकिन समझ में कुछ नहीं आ रहा ता।

मॉं- बाप की सेवा करने का अवसर मुझे नहीं मिला। लेकिन सेना ही मेरे माता- पिता हैं, यह सोचकर मैं अंतिम क्षण तक मातृभूमि की सेवा करता रहूंगा। "भारत माता की जय.' "शिवाजी महाराज की जय'। जय हिंद

यह किताब भारत जैसे विशाल जनतंत्र देश का हर जवान तथा सभी देशवासियों के लिए निश्‍चित रूप में प्रेरणादायी सिद्ध होगी इसमें संदेह नहीं। पुस्तक प्रेमी इस किताब का जरूर स्वागत करेंगे ऐसा पूरा विश्‍वास है।

लेखक का परिचय

img

श्री संतोष प्रभू धायबर जी गत 21 सालों से पत्रकारिता मे कार्यरत है। वर्तमानस्थिती में वे दैनिक 'सकाळ' वृत्तपत्र समूह मे वरिष्ठ उपसंपादक के नाते अपनी जिम्मेदारी सँभल रहे हैं। उन्होंने समकालीन सामाजिक विषयोंपर निरंतर लेखन किया है। सोशल नेटवर्किंग माध्यम, उनका प्रसार, समाज पर हुए परिणाम वह उनके अभ्यास के विषय रह चुके हैं। सामाजिक विषय से संबंधित उनके अनेक लेख, ब्लॉग प्रसिद्ध हुए है। भारतीय लश्कर एवं जवान उनका घनिष्ठ विषय है।

पाकिस्तान के कब्जे में अटके हुए जवान चंदू चव्हाण के बारे में 2016 के अंत में काफी चर्चा हुई। चव्हाण ने पाकिस्तान की कालकोठरी में असंख्य वेदनाओं का सामना किया। चव्हाण भारत में लौटने पर सर्वप्रथम श्री धायबर जी ने उनसे भेंट करके मुलाकात हासिल की। वह मुलाकात 'सकाळ' में प्रसिद्ध हुई और पुरे देश में इसने ख्याति प्राप्त कर ली।

श्री धायबर जी द्वारा लिखी गई यह दुसरी किताब है। इसके पूर्व उन्होंने कर्मयोगी कुंडलिकराव थोरात जी की जीवनी पर लेखन किया है। श्री धायबर जी द्वारा लिखित नया उपन्यास जल्द ही प्रकाशित होनेवाला है। पुणे (महाराष्ट्र) जिले के शिरूर तहसील का www.shirurtaluka.com यह संकेतस्थळ उन्होंने नौ साल पहले शुरू किया है। इस तरह की प्रयोगशीलता उस समय काफी मर्यादित थी।पुस्तक खरेदी करा फक्त 170

(मूळ किंमत 150 + पोस्टेज 20 )

मराठी आवृत्ती करिता ऑनलाईन 170 देण्यासाठी इथे क्लिक करा     हिंदी आवृत्ती के लिए ऑनलाईन 170 का भुगतान करने के लिए यहां क्लिक करें
Hindi copy is yet to be published. You are paying to book your copy before publishing.

संपर्क

Ishwari Prakashan
55, Mangalwar Peth, Janganga Apartment, Pune- 411 011    P: +91 - 9881242616
ishwariprakashan@gmail.com